मंडळाची स्थापना

महाराष्ट्र राज्यात खादी व ग्रामोद्योगाना प्रोत्साहन देऊन, त्यांचे संघटन विकास व विनियमन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना दि. ११ एप्रिल १९६० साली मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम १९६० (सन १९६० चा मुंबई अधिनियम क्रमांक १९ नुसार) करण्यांत आली आहे. हे मंडळ संपूर्ण स्वायत्त मंडळ आहे.

उददेश

मंडळाची रचना

मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम १९६० च्या (सन १९६० चा मंबई अधिनियम क्रमांक १९) कलम ४ (१) व (२) मधील तरतुदींनुसार शासनाकडून मंडळावर अध्यक्ष व सदस्याची नियुक्ती करण्यांत येते. महाराष्ट्र शासनाने ज्या व्यक्ती खादी ग्रामोद्योगाशी निगडीत आहेत व ज्यांना खादी ग्रामोद्योगांच्या कामांचा अनुभव आहे अशा अशासकीय किमान ५ व कमाल ७ सदस्यांची नियुक्ती मंडळावर करण्यांत येते. मंडळाचे सदस्य सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम पहातात. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती शासनाकडून केली जाते.
कलम ४ अन्वये सदस्यांचा कालावधी त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती, सेवेतील भत्ते विहीत करण्यांत येतील, त्याप्रमाणे असतील.

जिल्हा समिती

ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक परिणामकारक प्रभाव पाडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हा समितीची स्थापना केली जाते. त्यामध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने मंडळाने नेमावयाच्या एका अशासकीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती करण्यांत येते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष, जिल्हा लिड बॅकेचे प्रतिनिधि असे तीन सदस्य, या व्यतिरिक्त तीन अशासकीय व्यक्ती या पैकी एक तरी व्यक्ती अनसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती यापैकी असेल आणि त्याच्यापैकी एक तरी व्यक्ती स्त्री सदस्य असेल, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, महाव्यवस्थापक/जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा समाज कल्याण अधिकारी असे तीन सदस्य व मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पहातात.
कलम ७ अन्वये जिल्हा समितीची रचना व अधिकार व कार्ये ठरविण्यात आलेली आहेत.